Shivam Dube-Anjum Khan : भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच संपलेल्या T20 मालिकेवर ब्लॉकबस्टर प्रभाव पाडला, ज्यामध्ये भारताने 3-0 असा क्लीन स्विप केला. 30 वर्षीय या खेळाडूने पहिल्या दोन गेममधील विजयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्याने भारतातील पहिला कलर्स, प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला आहे.
दरम्यान, असं असलं तरी शिवम त्याच्या लग्नामुळेही चांगलाच चर्चेत आहे. शिवम दुबेने मुस्लिम तरुणीशी लग्न केलंय याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. शिवम दुबेच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. शिवम दुबेची क्रिकेट कारकिर्द आणि पर्सनल लाइफ चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी आहे.
मुंबईचा राहणारा शिवम दुबे, त्याची दीर्घकाळची मैत्रीण अंजुम खान हिच्याशी 16 जुलै 2021 मध्ये लग्न केले. अंजुम मुस्लिम असल्याने दुबे आणि अंजुमने त्यांच्या लग्नाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा गोंधळ झाला होता. नेटकऱ्यांनी या दोघांवर कमेंटचा भडीमार करत त्यांना चांगलाच ट्रोल केलं होत. दोघांच्या कुटुंबीयांनी मात्र त्यांच्या लग्नात आणि नात्यात पूर्ण पाठिंबा दिला.
मूळची उत्तर प्रदेशची असलेली अंजुम एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे आणि तिने हिंदी मालिका आणि संगीत अल्बममध्ये काम केले आहे. शिवम दुबे आणि अंजुम खान एकमेकांना अनेक वर्ष ओळखत होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतरच लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय दोघांनाही घेतला. वेगवेगळे धर्म असूनही दोघांना आपल्या प्रेमावर आणि एकमेकांवर विश्वास होता आणि म्हणूनच इतक्या वर्षानंतरही ठाम राहात दोघांनी लग्न केले.
शिवम आणि अंजुमच्या प्रेमाबद्दल कोणालाही अजिबात माहीत नव्हते. दोघांनीही सिक्रेट डेटिंग केली होती. धर्म वेगवेगळे असल्यामुळे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत दोघांनीही याबाबत कोणाकडे वाच्यता केली नव्हती. अनेक जणांना शिवम सिंगल वाटत होता. पण अचानक लग्न करून सर्वांनाच त्याने आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, लग्नाच्या एक वर्षानंतर या दोघांनी एका बाळाला जन्म दिला असून, सोशल मीडियावर देखील गे कपल चांगलंच सक्रिय आहे. आणि सतत आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करत असतात.