#FIHOlympicQualifiers2024 : भारताचा शूटआऊटमध्ये पराभव, पॅरिसच्या तिकीटासाठी आज जपानशी लढत ..

FIH Olympic Qualifiers, Ranchi 2024 :- भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी येथे एफआयएच ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत लढाऊ मनोवृत्ती दाखवली, परंतु असे असतानाही पेनल्टी शूटआऊटच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात धीर गमावला आणि जर्मनीकडून 4-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत असल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. या विजयासह जर्मनीने पॅरिस ऑलिम्पिकच्या तिकीटावर शिक्कामोर्तब केले आहे. भारतासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची आणखी एक संधी आहे.
After a solid performance throughout the game, win alluded the team in sudden death (Shootout) after the Full time ended with a last minute equalizer from Ishika.
Germany are into the finals, we face Japan for the coveted 3rd spot.
FT:
Germany 🇩🇪 2 – India 🇮🇳 230’… pic.twitter.com/V4aliv8q8m
— Hockey India (@TheHockeyIndia) January 18, 2024
शुक्रवारी 4 वाजून 30 मिनिटांनी तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठीच्या लढतीत जपानचा पराभव करून हा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतो. या स्पर्धेतील अव्वल तीन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील.जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकाचा संघ जर्मनीचा सामना शुक्रवारी अमेरिकेशी अंतिम फेरीत होणार आहे.
A ticket to Paris is still at stake.
Today we play against Japan in the 3/4 playoff in #FIHOlympicQualifiers, Ranchi 2024.
Let’s be the voice behind the team.#HockeyIndia #IndiaKaGame #EnRouteToParis @CMO_Odisha @FIH_Hockey @HemantSorenJMM @Media_SAI @sports_odisha pic.twitter.com/hv4raN8nkI
— Hockey India (@TheHockeyIndia) January 19, 2024
भारताकडून दीपिका 15व्या मिनिटाला) आणि इशिका चौधरी (59व्या मिनिटाला) यांनी निर्धारित वेळेत गोल केले. जर्मनीसाठी शार्लोट स्टेपनहॉर्स्टने (27वा, 57वा) दोन्ही गोल केले.





