दोहा – फिफा विश्वकरंडक ( FIFA World Cup ) फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी अर्जेंटिना व फ्रान्स या दोन बलाढ्य संघांत रंगणार आहे. मात्र, या सामन्याला काही तासांचा कालावधी बाकी असतानाच अर्जेंटिनासाठीच नव्हे तर जगभरातील चाहत्यांसाठी धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात त्याची दुखापत गंभीर नसून तो या लढतीत खेळण्याची शक्यता असल्याचा खुलासा अर्जेंटिना संघ व्यवस्थापनाने केला आहे.
#RanjiTrophy । महाराष्ट्राचा दिल्लीवर दणदणीत विजय; स्पर्धेत विजयी सलामी
क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत मेस्सीच्या हाताचे व डाव्या पायाचे स्नायू दुखावले होते. त्याने तातडीने उपचारही करून घेतले होते. मात्र, सामना संपल्यावर आतापर्यंतही त्याला उपचार करावे लागत आहेत. त्यामुळेच तो गुरुवारी तसेच शुक्रवारी संघाच्या सराव सत्रातही सहभागी झाला नव्हता. सध्या वैद्यकीय तज्ज्ञ त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. मेस्सीला या सामन्यात खेळता आले नाही तर तो अंतिम लढतीपूर्वीच तसेच अर्जेंटिनाला करंडक जिंकून देण्याआधीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाल्याचे निश्चित होणार आहे.
#RanjiTrophy । महाराष्ट्राचा दिल्लीवर दणदणीत विजय; स्पर्धेत विजयी सलामी
कारण त्यानेच या सामन्यानंतर आपल्या निवृत्तीचे संकेत दिले होते. अंतिम सामना हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय विश्वकरंडक ( FIFA World Cup ) स्पर्धेतील सामना ठरणार असून, संघाला विश्वविजेता बनवूनच निवृत्ती घेणार असल्याचे मेस्सीने सांगितले होते. आता येत्या शनिवारी रात्रीपर्यंत त्याच्या दुखापतीबाबत तसेच त्याच्या तंदुरुस्तीबाबत माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यानंतरच तो अंतिम सामना खेळणार का, याबाबत खुलासा होणार आहे.