न्युयॉर्क :– अर्जेन्टिना संघाने 2022 सालची फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत त्यांचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याने वापरलेल्या सहा जर्सीचा आता लिलाव होणार आहे. या लिलावाचे आयोजन करत असलेल्या संस्थेला या लिलावातून जवळपास 90 कोटी रुपये मिळण्याचा विश्वास आहे.
यापूर्वी अर्जेन्टिनाचा सुपरस्टार दीएगो मॅराडोनाच्या गाजलेल्या हॅण्ड ऑफ गॉड जर्सीला यापूर्वी झालेल्या लिलावात जवळपास 75 कोटी रुपये मिळाले होते. अमेरिकेती सोथबीझ ही कंपनी मेस्सीच्या जर्सीचा लिलाव करणार आहे.
Oliver Kahn : ऑलिव्हर कान यांच्या फुटबॉल अकादमीमुळे भारताची होणार प्रगती….
मेस्सीने गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत एकूण सात जर्सी परिधान केल्या होत्या. त्यातील सहा जर्सींसाठी हा लिलाव होणार आहे. मेस्सीने कतारमध्ये झालेल्या या संपूर्ण स्पर्धेत सर्व सात सामने खेळताना प्रत्येक सामन्यात गोल केला. हा लिलाव 30 नोव्हेंबर ते 14 डीसेंबर या कालावधीत ही जर्सी चाहत्यांना पाहण्यासाठी ठेवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लिलाव होणार आहे.