श्रीनगर :- बनिहाल-कटरा रेल्वे मार्गावर भारतातील सर्वात मोठ्या ‘एस्केप’ बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा प्रतिष्ठित उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन प्रकल्पाचा भाग आहे. बनिहाल-कटरा मार्गावरील 12.75 किलोमीटर लांबीच्या T-49 (भारतीय रेल्वेचा सर्वात लांब बोगदा) नंतरचा हा चौथा बोगदा आहे.
The 12.89 km tunnel, which is the longest escape tunnel of India, on the 111 km under-construction Banihal-Katra railway line got completed on Thursday.@PMOIndia@RailMinIndia @OfficeOfLGJandK pic.twitter.com/y3jgRr8rTN
— Information & PR, J&K (@diprjk) December 16, 2022
या 12.75 किमी लांबीच्या एस्केप बोगद्यासोबत एक जोडबोगदा बनवण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्ये सुलभ करण्यासाठी या बोगद्याची तरतूद करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12.89 किलोमीटर लांबीचा “एस्केप’ बोगदा ‘T-13′ आणीबाणीच्या परिस्थितीत बचाव कार्य सुलभ करण्यासाठी बांधण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा “एस्केप’ बोगदा आहे.
Nazca Geoglyphs : पेरुच्या नाझका वाळवंटात आढळली 160 प्राचीन रेखाचित्रे
भारतीय रेल्वेने गुरुवारी याबाबत एक ट्विट शेअर केले आहे. ट्विटनुसार, यूएसबीआरएल प्रकल्पाच्या कटरा-बनिहाल विभागावरील सुंबर आणि खारी स्थानकांदरम्यानचा भारतातील सर्वात लांब एस्केप बोगदा (12.895 किमी) टी-49 पाडून बांधण्यात आला आहे. हा बोगदा मैलाचा दगड ठरणार आहे.