वॉर्सा : रक्तपिपासू व्हाम्पायारच्या कहाण्या नेहमीच सर्वांना आकर्षित करत असतात. ड्रॅक्युला आणि इतर चित्रपटांच्या माध्यमातून अशा व्हॅम्पायर लोकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. पोलंडमध्ये नुकतेच एका ठिकाणी केलेला खोद कामांमध्ये अशाच एका कथित महिला व्हॅम्पयरचा कंकाल सापडला आहे. या सापळ्याच्या गळ्याभोवती लोखंडी साखळी किंवा कोयत्यासारखे काहीतरी गुंडाळण्यात आले असून पायही बांधण्यात आल्याचे लक्षात आले.
पोलंडमधील पीएन नावाच्या एका गावातील 17व्या शतकातील कब्रस्तान मध्ये खोदकाम सुरू असताना हा सापळा संशोधकांना सापडला. त्याची एकंदर परिस्थिती पाहता तो त्या काळातील एखादा व्हॅम्पायरचा सापळा असावा असे संशोधकांचे मत पडले या सापळ्याच्या डोक्यावर एक रेशमी टोपी होती. तशी गळ्याभोवती काही लोखंडी वस्तू गुंडाळण्यात आल्या होत्या आणि पायही बांधण्यात आले होते कवटीतील दोन दात वर आलेले ही संशोधकांना दिसले.
कोपर्निकास विद्यापीठातील संशोधक डेरीअस पोलीसकी यांनी या कंकाल बाबत विशेष माहिती माध्यमांना दिली आहे. त्या काळातील मान्यतेप्रमाणे मृत व्यक्तीने पुन्हा जिवंत होऊन त्रास देऊ नये म्हणून अशाप्रकारे हात-पाय बांधून पुरण्यात येत होते असे त्यांनी सांगितले आहे. हातपाय बांधलेली ही व्यक्ती जर उठून उभी राहिली तर गळ्या भोवती असलेल्या कोयत्याने त्याचा गळा चिरण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे अशी व्यक्ती उठून उभे राहू नये अशा प्रकारे या गळ्याभोवती ही लोखंडी वस्तू बांधण्यात आली होती.
सापळ्याचे पाय बांधण्यात आले होते त्या ठिकाणी एक कुलूपही लावण्यात आले होते. पुरलेल्या व्यक्तीच्या पायाला अशाप्रकारे जर कुलूप लावण्यात आले याचा अर्थ व्हॅम्पायर म्हणून किंवा इतर कोणत्याही प्रकारे ती व्यक्ती पुन्हा जगात येऊ शकत नाही. 2015 मध्ये सुद्धा पोलंडमध्ये अशाच प्रकारचे सात हाडांचे सापळे मिळाले होते ते सुद्धा व्हॅम्पायरचेच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.