असे नेहमी म्हटले जाते की आई कितीही जवळची असली तरी आपल्या लेकीसाठी बाबा हे एक वेगळं प्रेम असतात. वडील आणि मुलगी यांच्यातील नातं खरोखरच खूप खास देखील असतं. असच नातं एका श्रुत्वा देसाईने शेअर केलेल्या व्हिडिओमधून व्हायरल होताना दिसत आहे.
श्रुत्वाच्या वडिलांनी आपल्या लेकीसाठी कॅनडातच राहायचं ठरवलं आणि भारतातून कॅनडाचा प्रवास केला. कॅनडात ती जेव्हा तिच्या कामावर होती तेव्हा तिला अचानक तिच्या वडिलांसारखी व्यक्ती दिसली आणि तीने वडिलांना पाहून घट्ट मिठी मारली… या बाप लेकीचा हा भावनिक क्षण सध्या सगळ्यांना भावुक करतोय.
श्रुत्वा कॅनडात शिक्षणासाठी गेली होती. शिक्षणाचा कालावधी दीड वर्षांचा होता, घरचे पुरेसे पैसे न पुरवू शकल्यामुळे ती तिथे सोबतच नोकरी देखील करत होती. पण ज्यावेळेस तिची शिक्षणाची वेळ संपत आली, तेव्हा मात्र तिला आपल्या मायदेशी परतता आले नाही. सोबत असलेले तिचे सगळे मित्र आपापल्या घरी आपल्या कुटुंबासोबत होते. श्रुत्वाच्या व्हिसाला मात्र वेळ लागत होता आणि विमानाचे तिकिटाचे भाडे देखील अडीच लाखापर्यंत पोहचले होते. या कारणामुळे श्रुत्वा घरी जाऊ शकली नाही.
View this post on Instagram
श्रुत्वाने इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केली व ती म्हणाली “हा माझ्यासाठी न विसरता येणारा क्षण आहे. मला विश्वासच बसला नाही माझे बाबा मला पाहण्यासाठी एवढ्या लांब आले. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा….”
या बापलेकीच्या या व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिक लाईक आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांना आपले स्वतःचे पालक त्यात दिसत आहे. तर अनेकांना आपल्या पालकांवरचे प्रेम….