सांगली – सांगलीच्या विटा येथे आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि कार यांचा भीषण अपघातात झाला असुन या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात तीन पुरुष व एक महिला जागीच ठार झाले आहेत. तर जखमींना उपरासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले असून त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि मालाड (मुंबई) येथील बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.
हे सर्व जण तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कारचालकाला झोप आल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरील लोकांनी दिली असून विटा पोलीस ठाण्यात अपघाताबाबतची नोंद करण्यात आली आहे.