नवी दिल्ली – भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहचेच नाव घेतले जात असले तरीही माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने महंमद शमी याला पसंती दिली आहे.
परदेशातील खेळपट्टीवर शमी जास्त सरस सिद्ध होतो, कारण त्याच्याकडे इन व आऊट असे दोन्ही स्विंग आहेत. बुमराहकडे अफलातून यॉर्कर असला तरीही शमीकडे असलेला स्विंग जास्त उपयोगी सिद्ध होतो. खास करून परदेशातील वेगवान खेळपट्टीवर शमी जास्त प्रभावशाली ठरू शकतो, असेही नेहराने सांगितले.