टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच दमदार कामगिरी करतो. क्रिकेट व्यतिरिक्त तो वैयक्तिक आयुष्यात खूप भावनिक आणि नम्र व्यक्ती आहे. क्रिकेट विश्वचषक संपल्यानंतर शमी रिलॅक्स मोडमध्ये आहे. सध्या तो नैनितालमध्ये सुट्टी घालवत आहे.
View this post on Instagram
त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये तो अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. मोहम्मद शमीने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तो व्यक्ती खूप भाग्यवान आहे, देवाने त्याला दुसरे आयुष्य दिले आहे.
दरम्यान, नैनितालमधील एका खड्ड्याच्या दिशेने ती कार डोंगराळ रस्त्यावरून खाली पडली. ते माझ्या गाडीच्या समोरून चालत होते. आम्ही त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले. व्हिडिओमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज आणि त्याचे सहकारी अपघातग्रस्त कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे. मोहम्मद शमी हे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक मोहिमेमध्ये प्रभावित करणाऱ्या खेळाडूंमध्ये एक प्रमुख नाव आहे. त्याच्या या पोस्टवर आता चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. त्याचे सोशल मीडिया युजर्स कौतुक करत आहे.