Mohammad Shami : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीला काही दिवसांपूर्वीच अर्जुन पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले. यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. सध्या शमी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो वराच्या रुपात दिसत आहे. यावरून तो लवकरच करणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.
मोहम्मद शमी पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाल्यानंतर तो लवकरच पुन्हा लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत एका नेटकऱ्याने “शमी भाई, तू पुन्हा लग्न करणार आहेस का?” तर दुसर्या युजरने लिहिले, “तुम्ही अलादीन, भाईसारखे दिसत आहात.” परंतु ह्या फोटो मागचे सत्य वेगळे आहे. शमी शेअर केलेला हा फोटो एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. जिथे त्याचे स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या गळ्यात हार आणि डोक्यावर फेटा घालण्यात आला होता.
View this post on Instagram
मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहाँसोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी हसीन पेशाने चीअरलीडर होती. लग्नाच्या चार वर्षानंतर हसीनने शमीवर लैंगिक छळ आणि हुंडाबळीचे गंभीर आरोप केले होते. याशिवाय हसीनने त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि अफेअरचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर आता या फोटोवरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.