World Cup 2023 IND vs AUS Final : एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून विजय मिळवला. अशा परिस्थितीत चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. स्पर्धेत आतार्यंत सलग 10 विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाची नजर आता विश्वचषकावर आहे.
मोहम्मद शमीचे रेकॉर्ड…
भारताचा वेगवान गोलंदाज याने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरूध्द 9.5 षटकात 57 धावा देताना 7 विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यदांच्या विश्वचषकात मोहम्मद शम्मी सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अव्वलस्थानी आहे. त्याने फ्कत 6 सामने खेळताना एकूण 23 विकेट घेत ही कामगिरी केली आहे. यामध्ये आस्ट्रेलियाचा गोलंदाज एडम जम्पा हा 10 सामन्यात 22 विकेटसह दुसऱ्या तर श्रीलंकेचा दिलशान मदुशंका 9 सामन्यात 21 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
(A) उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध तिसरी विकेट घेत विश्वचषकातील 50 बळी पूर्ण केले. यासाठी त्याने केवळ 17 डाव घेतले, जे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचा 19 डावात 50 बळी घेणारा विक्रम मोडला. तसेच शमीच्या नावावर आता भारताकडून विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स आहेत. शमीने वर्ल्ड कपमध्ये एकूण 54 विकेट घेतल्या आहेत.
(B) न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात 4 विकेट घेण्यासोबतच, मोहम्मद शमीने 8व्यांदा विश्वचषकात एका डावात 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. या विक्रमात शमी अव्वल स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे, ज्याने विश्वचषकात 6 वेळा 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
World Cup 2023 : कोहलीने सचिनचे एक नव्हे तीन ‘विराट’ विक्रम काढले मोडीत…
(C) मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने आशिष नेहराचा विक्रम मोडला. नेहराच्या नावावर एका सामन्यात 6 बळींचा विक्रम आहे. एवढेच नाही तर शमीने विश्वचषकातील बाद फेरीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
World Cup 2023 : कर्णधार रोहित हा Team India च्या यशाचा खरा हिरो! जाणून घ्या,त्याची कामगिरी…
(D) मोहम्मद शमी विश्वचषकात सर्वाधिक 5 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने चौथ्यांदा 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. शमीने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला. स्टार्कने विश्वचषकात तीनदा 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.