हिंगोली : एका शेतीकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील भोसी परिसरात शेतकरी रामदास गमाजी खोकले यांनी अफूची झाडे लावली आहेत.
भोसी शिवारात अफूची शेती होत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक विकास थोरात आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भोसी शिवारात छापा टाकला.
यात पोलिसांना दीड हजार अफूची झाडे आढळून आली. कांदा आणि लसूण पिकाच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी हे झाडे लावली होती. मात्र पोलीस येतानाची माहिती समजतास सदरील शेतकऱ्याने धूम ठोकली. दीड हजार झाडांच्या बंडाचे वजन साडेचार किलो आहे.