स्वतः राज ठाकरेही उपस्थित
मुंबई – सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीवरून देशभरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं असून या कायद्यांविरोधात व समर्थनार्थ अशा दोन्ही प्रकारची आंदोलनं देशभरात सुरु आहेत. अशातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या प्रकरणामध्ये उडी घेतली असून सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीच्या समर्थनार्थ आज मनसेने मुंबई येथे ‘महामोर्चाचं’ आयोजन केलं आहे.
या महामोर्चामध्ये स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सहभागी झाले असून त्यांच्यासोबत मनसेचे लाखो कार्यकर्ते सध्या मुंबईच्या रस्त्यावर उतरले आहेत. मनसेने बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची ठोस भूमिका घेतली असून, याबाबत आज राज ठाकरे आझाद मैदानावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
#मनसे_महामोर्चा ? pic.twitter.com/I6cDJC8nlm
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 9, 2020
महाराष्ट्र सैनिकांची अलोट उपस्थिती… #मनसे_महामोर्चा ? pic.twitter.com/ixeExt7ifp
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 9, 2020
…अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/yLNhQQ8HI7
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 5, 2020
भारत माझा देश आहे! #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/aUst3XCEJz
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 3, 2020