सांगली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील नेवरी मळा, आंबेगाव भागातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवसेना शेतकरी मदत केंद्राला भेट देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच
या कठीण प्रसंगात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांनी खचून न जाता गरज लागल्यास शिवसेनेला हक्काने हाक मारा, शिवसेना मदतीस धाऊन येईल असा धीर दिला.