सलमानच्या जागी फराह

सलमान खानच्या बिग बॉस 13 या शोमध्ये दररोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात वादात सापडलेला हा शो बंद होणार की काय अशी चर्चा होती. पण त्याची लोकप्रियताच इतकी प्रचंड आहे की त्यामुळे सर्व गोष्टी सुरळित होऊन जातात. आता या शोमध्ये सलमानच्या जागी अँकर म्हणून फराह खान येणार आहे.

वास्तविक, मागील काळातही एकदा फराहने सलमानची जागा घेत हा शो होस्ट केलेला आहे. बिग बॉसच्या आठव्या सिझनदरम्यान हे घडले होते. त्यावेळी काही कारणास्तव हा कार्यक्रम निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळ चालवावा लागणार होता. त्यामुळे सलमानच्या जागी फराहने सूत्रे सांभाळली होती.

आताही प्रेक्षकांच्या वाढत्या लोकप्रियतेची दखल घेत या शोची कालमर्यादा 13.5 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. यामुळे प्रेक्षक काही अंशी आनंदी झाले असले तरी आगामी भागात सलमान दिसणार नसल्यामुळे ते निराशही झाले आहेत.

सलमानला राधेफ चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे बिग बॉसच्या वाढीव भागात होस्टिंग करणे शक्‍य होणार नाहीये. पाच आठवड्यांपर्यंत हा शो पुढे चालणार आहे, यावरुन या शोची लोकप्रियता किती वाढली आहे हे लक्षात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.