महाबळेश्‍वर तालुक्‍यातील घाटरस्त्यांवर पडझड सुरूच

सातारा – महाबळेश्‍वर तालुक्‍यातील पसरणी, केळघर व आंबेनळी या तीन घाटात ठिकठिकाणी पडझड सुरू झाली आहे. यामुळे अपघाताचा धोका संभवत असल्याने संबंधित विभागाने सतर्क राहून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुळातच महाबळेश्‍वर हा पावसाचा तालुका असून एकदा सुरू झालेला पाऊस संततधार कोसळत असल्याने घाटात पडझडही सुरूच असते. शिवाय, रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्याबाबतही शासनाची उदासिनता आढळून येत आहे. महाबळेश्‍वर पर्यटनस्थळ असल्याने मेढ्याहून केळघर घाट, वाईवरून पसरणी घाट व महाडहून आंबेनळी घाट लागत असल्याने संबंधितांनी डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)