मुंबई – देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः अमित शाह यांनी याबाबत ट्विट करत आपला कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याची माहिती दिली. अमित शाह यांना कोरोना बाधा झाल्याचे वृत्त समजताच त्यांची कोरोनातून लवकरात लवकर सुखरूप सुटका व्हावी यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे.
अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाह यांची कोरोनातून सुखरूप सुटका व्हावी अशी प्रार्थना केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट केलं असून ते लिहतात, “आपल्याला लवकरात लवकर सुदृढ आरोग्य प्राप्त होवो. संपूर्ण राष्ट्राच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत.”
मा. @AmitShah भाई,
आपको यथाशीघ्र स्वास्थ्य लाभ हो यही ईश्वर से प्रार्थना है । पूरे राष्ट्र की शुभकामनाएँ आपके साथ है । https://t.co/E5zTrqh4By— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 2, 2020
तत्पूर्वी, आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर मी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता मी रुग्णालयात भरती होणार आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घ्यावी.” असं ट्विट करत आपल्याला कोरोना बाधा झाल्याची माहिती दिली होती.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020