मुंबई -भाजपा प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस महाआघाडी सरकारला खडेबोल सुनावले. तर अमृता फडणवीस यांवर सोशल मीडियावर होणाऱ्या टिकेवरही त्यांनी भाष्य केले आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलता, काय टीका करता, काय ट्विट करता, हे सर्वांनी पाहिले आहे. पण मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर हे उत्तरानेच देईल.’ असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेवर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं.
‘…तर आज मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती’
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतातच. पण आता अमृता फडणवीस प्रकाशझोतात येण्याचं कारण काहीसं वेगळं आहे. अमृता अनेकदा सोशल मिडियावर गाण्यामुळे चर्चेत असतात.
“ती मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही”
त्यांनी भाऊबीजचं निमित्त साधत ‘तिला जगू द्या’ हे गाणं अमृता यांनी सादर केलं. हे गाणं महिला आणि मुलींना समर्पित आहे. टी- सीरीज मराठी ने या गाण्याची निर्मिती केली. विशेष म्हणजे या गाण्याला 44,000 डिसलाईक्स मिळाले आहेत. तर 6,600 लाईक्स मिळाले आहेत.
कंगना पुन्हा संजय राऊतांच्या निशाण्यावर, ट्विट करत केला सवाल…