नवी दिल्ली – फेसबुक आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग बनला आहे. त्या फेसबुकवर सामाजिक द्वेष पसरवण्यात मदत केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. देशाची राजधानी दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलीत फेसबुकची अशा विघातक कामांसाठी मदत झाली का याचा उलघडा होणार आहे. कारण पहिल्यांदाच फेसबुकचा एखादा आंतरराष्ट्रीय कर्मचारी आता भारतीय चौकशी समितीसमोर हजर होणार आहे.
फेसबुक समाजाला जोडण्याचं काम करत की तोडण्याचं.? अल्पंसंख्यांकाबद्दल चुकीच्या भावना पसरवण्यात फेसबुकची मदत होते? या आणि अशा अनेक गंभीर प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. याप्रकरणी पहिल्यांदाच फेसबुकचा आंतरराष्ट्रीय कर्मचारी आता भारतीय चौकशीसमोर फेसबुकची गुपितं उघड करणार आहे. ज्याचं नाव आहे मार्क लुकी. फेसबुकमध्ये डिजीटल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून लुकी यांनी 2017 ते 2018 या वर्षात काम केलेले आहे.
याबाबत दिल्ली विधानसभेने मार्चमध्ये चौकशीसाठी शांतता आणि सद्भभावना समिती स्थापन केली होती. आपचे आमदार राघव चढ्ढा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीसमोर उद्या मार्क लुकी हजर होणार आहेत.
10 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता समितीने बैठक बोलावली आहेत. विशेष म्हणजे त्यात मार्क लुकी यांची जी साक्ष आहे तिचं लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. यात पारदर्शकता राहावी यासाठी हे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.