Jammu and Kashmir – जम्मू़काश्मीरमधील खौद, अखनूर येथील एलओसीला लागून असलेल्या कचरेयाल गावाजवळ रस्ता बांधकामादरम्यान दारूगोळा सापडला. हा दारुगोळा पोलिसांनी नष्ट केला.
शनिवारी कचरेयाल गावाजवळ रस्ता बांधकामासाठी जेसीबीने खोदकाम सुरू होते. यावेळी आठ मोर्टार शेल, १९५ एलएमजी आणि एसआरएल काडतुसे आणि १३ रॉकेट सापडले.
हा दारुगोळा पाहून खोदकाम मजुरांनी खळद पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर दारूगोळा ताब्यात घेतला. यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. जप्त केलेला दारूगोळा जुना असून तो नष्ट करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी या भागात ड्रोनमधून शस्त्रे टाकल्याच्या सूचना मिळाल्या होत्या. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली, मात्र काहीही सापडले नाही. पण, आता जप्त केलेला दारूगोळा बराच जुना आहे.