मुंबई – गेला आठवडाभर कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न बॉलीवूडमध्ये गाजत होते. या इव्हेंटबद्दल सगळ्यांमध्ये खूपच उत्सुकता होती. या समारंभाचे निमंत्रण कोणाकोणाला दिले गेले होते. कोण कोण उपस्थित होते.
याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. सलमान आणि रणबीर कपूर हे दोघेही कतरिनाचे चांगले मित्र आहेत. ते लग्नाला गेले होते की नाही याबद्दलही उत्सुकता आहे. मात्र, या दोघांनी कतरिनाला एक महागडे गिफ्ट दिले असल्याची बातमी आता पुढे आली आहे. सलमान खानने कतरिनाला 3 कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार भेट दिली आहे, असे सोशल मीडियावरून समजते आहे.
सलमान खान दिलदार आहे, हे सगळ्या इंडस्ट्रीला माहीत आहे. तो अधूनमधून आपल्या मित्रांना काही तरी गिफ्ट देतच असतो. मात्र, कतरिनाला त्याने दिलेले गिफ्ट आतापर्यंतचे सर्वात महागडे गिफ्ट असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूरनेही आपल्या खास मैत्रिणीला 2.7
कोटी रुपयांचे मौल्यवान नेकलेस गिफ्ट केले आहे. रणबीर आणि कतरिनाचे मालदिवचे फोटो व्हायरल होत होते, तेव्हा रणबीर दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. पण त्यांच्यातील मैत्रीचे संबंध कायम राहिले होते.