भिडे गुरुजींविरोधात तपासास मुदतवाढ

मुंबई: पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संभाजी भिडे यांच्या विरोधातील दाखल करण्यात आलेल्या गुन्हाचा तपासापूर्ण करण्यासाठी न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीसांना आणखी तीन महिन्याची मुदतवाढ दिली. बनिता सावळे या महिलेने भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्या संबंधी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने ही मुदतवाढ दिली.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगावामध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. या दंगल प्रकरणात अनिता साळवे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एकबोटे यांच्या विरोधात कारवाई होऊन अटक झाली. मात्र, संभाजी भिडे यांच्यावर अजून कोणतीच कारवाई झालेली नसल्याने यांची दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. मागील सुनावणीच्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी आपण या प्रकरणाचा तपास सुरू असून कारवाई केली जाईल, अशी हमी न्यायालयाला दिली होती. आज सुनावणीच्यावेळी ग्रामीण पोलीसांनी तपासाला आणखी तीन महिन्याची मुदतवाढ द्यावी. अशी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करून 11 नोव्हेबरला तपासाचा प्रगत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.