शिरूर -शिरूर शहर व पंचक्रोशीत फिरता दवाखाना करोना संसर्गाच्या काळात गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. तीन दिवसांत एक हजार रुग्णांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले आहे.
आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून व बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे व भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स व रिअल्टी यांच्यावतीने शिरूर पंचक्रोशीसाठी फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर फिरता दवाखाना शिरूर शहरासह प्रत्येक गावात, वाडी, वस्ती, जाऊन नागरिकांना मोफत उपचार व औषध गोळ्या ही मोफत रुग्णांना देण्याचे काम सुरू केले आहे.
अरुण घावटे, बाजार समिती संचालक बंडु जाधव, विजेंद्र गद्रे, प्रवीण चोरडिया, नामदेव जाधव, पप्पू पवार, राजेंद्र दसगुडे, नियोजन करीत आहे. प्रत्येक रुग्णाचे रेकॉर्ड ठेवले जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.