पुणे – उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 8 जूनपासून शिवाजीनगर न्यायालय सुरू होत आहे. मात्र, सध्या न्यायालयात गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केलेले डीएसके, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आणि मोक्काच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे, अशा महत्त्वाच्या प्रकरणात गर्दी आटोक्यात ठेवणे हे न्यायालयीन प्रशासना पुढे आवाहन आहे.
करोना संसर्गामुळे दोन महिन्याहून अधिक कालावधीपासून न्यायालय बंद आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत केवळ महत्त्वाच्या दाव्यावर सुनावणी होत होती. व्हिडीओ कॉन्फरसिंगचाही वापर करण्यात येत होता. मात्र, सोमवारपासून (दि. 8) दोन सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रामध्ये न्यायालय सुरू होणार आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी अनेकजण येत असतात. आरोपींचे फॅन येण्याची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळात आवाहन करून देखील न्यायालयात पक्षकार, वकील विनाकारण गर्दी करताना दिसले होते. त्यावेळी सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडाला.
मात्र, करोनाच्या पार्श्वभूमी नवीन नियमावलीनुसार ज्याचे काम आहे. त्या वकील अथवा पक्षकारालाच सोडण्यात येणार आहे. डिएसके प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये 32 हजार पेक्षा गुंतवणूकदारांची 3 हजार कोटीहून अधिक फसवणूक करण्यात आली आहे. या सुनावणीसाठी अनेक पक्षकार येत असतात. ज्यामध्ये ज्येष्ठ पक्षकारांची संख्या अधिक आहे. त्यातच दाभोलकर, जर्मन बेकरी प्रकरणाची सुनावणी असते. ही ऐकवण्यासाठी नागरिक येत असतात. अशा प्रकरणांअमध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर होणारी गर्दी आटोक्यात आणणे हे प्रशासनापुढचे महत्वाचे आव्हान असणार आहे