कोथरूड – सध्याच्या लॉक-डाऊन च्या काळात नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये ह्यासाठी श्रीमान योगी प्रतिष्ठान च्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबून स्वतःचे, कुटुंबाचे व पर्यायाने समाजाचे संरक्षण करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी केले आहे. भाजी-पाला, किराणा, दूध, औषधे, रिक्षा सेवा अश्या अत्यावश्यक गोष्टींची सेवा नागरिकांना प्रतिष्ठान करून देण्यात येत आहे. ह्याबरोबरच लोकांच्या अडचणी ओळखून इले क्ट्रीशीयन, प्लंबर व AC दुरुस्ती ह्या सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमदार चंद्रकांत पाटील व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनानुसार या सेवा पुरवल्या जात आहेत.