Esha Deol : अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले आहे. मात्र हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिला सिनेइंडस्ट्रीत फारसे यश मिळू शकले नाही. त्यानंतर आता ईशा देओलबाबत एक माहिती समोर आला आहे. ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती समोर आली आहे.
ईशा आणि भरत कोणत्याही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आलेले नाहीत. तसेच एकमेकांसोबतचे फोटोही त्यांनी शेअर केलेले नाहीत. ईशाचा पती भरत याचे विवाहबाह्य संबंध असल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे सांगितले जात आहे. भरतची गर्लफ्रेंड बंगळूरमध्ये राहणारी आहे. अद्याप देओल कुटुंबियांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
ईशा आणि भरत यांचा घटस्फोट होणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी भरतला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर ही बातमी समोर आल्यानंतर युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘भरतला बघून असे वाटले की तो त्याच्या कुटुंबावर आणि पत्नीवर खूप प्रेम करतो.’
ईशा देओलने 29 जून 2012 रोजी भरतशी लग्न केले होते. दोघांचे लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणाने पार पडले. लग्नाच्या पाच वर्षानंतर हे जोडपे मुलगी राध्याचे पालक झाले आणि त्यानंतर 2019 मध्ये ईशाने त्यांची दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला. हे स्टार कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसत आहे. मात्र, यावेळी भरत ईशा देओलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधून गायब होता. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसालाही भरत दिसला नव्हता.