Salman Khan: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. अनेकदा त्यांचे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले आहेत. मात्र त्यांच्या चित्रपटांवर टीका होऊनही त्यांचे चित्रपट सुपरहिट झाल्याचे पाहायला मिळाले. संजय लीला भन्साळी आता ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता सलमान खान (Salman Khan) झकळणार असल्याचे म्हंटले जात होते.
सलमानसह या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट देखील झळकणार असल्याची चर्चा आहे. परंतु या सिनेमातून आता सलमान खानचा पत्ता कट झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच काय तर आता या सिनेमातील सलमानची जागा शाहरूख खान घेणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.
आता या चित्रपटात सलमान खानच्या जागी शाहरुख खान दिसणार आहे. या चित्रपटासाठी भन्साळी एका महिन्यात अनेकवेळा शाहरुख खानला भेटल्याचे वृत्त समोर आले आहे. भन्साळींनी किंग खानला चित्रपटाची स्क्रिप्टही वाचून दाखवली, जी त्यांना खूप आवडली. मात्र अद्याप काहीही ठरलेले नाही. यापूर्वी संजय लीला भन्साळी आणि सलमान खानने याआधी एकत्र काम केलं आहे. त्यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
खरं तर, संजय लीला भन्साळी त्यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट इन्शाअल्लाह या वर्षी बनवण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटावर तो बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार भन्साळी या वर्षी मे किंवा जूनपासून या चित्रपटात काम करण्याची तयारी करत आहेत. इंशाअल्लाह व्यतिरिक्त संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट ‘बैजू बावरा’ देखील याच वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपट निर्मातेही या चित्रपटावर वेगाने काम करत आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.