काळेवाडी-चिखली बीआरटी मार्गात त्रुटी

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते चिखली हा बीआरटीएस मार्ग तयार करण्यात आला असून, तो बस वाहतुकीसाठी खुला करणेचे नियोजन केले आहे. मात्र, या मार्गावर त्रुटी असून, त्या आधी दूर कराव्यात. त्यानंतरच मार्ग खुला करण्यासंबंधी हालचाली कराव्यात, अशी मागणी “फ’ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
यासंदर्भात यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कुदळवाडी मुख्य बीआरटीएस रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत ते बुजवून त्या ठिकाणी डांबरीकरण करावे.

कुदळवाडी ते मोईफाटा रस्त्यावरील सर्व पदपथ दुरुस्त करून त्यावरील अतिक्रमण हटविणे आवश्‍यक आहे. कुदळवाडी ते मोईफाटा या मार्गावर नो पार्किंग फलक लावणे गरजेचे आहे. तसेच, कुदळवाडी ते मोईफाटा रस्त्यावरील दुभाजक तुटलेले आहेत त्याची दुरुस्ती करण्यात यावी. कुदळवाडी ते मोईफाटा रस्त्यावरील सर्व पथदिवे बंद आहेत, त्याची दुरुस्ती करावी. कुदळवाडी ते मोईफाटा रस्त्यावरील बस थांब्यावर बस वेळापत्रक लावावे. कुदळवाडी ते मोईफाटा रस्त्यावरील ड्रेनेज व स्ट्रॉमवॉटर व्यवस्था दुरुस्त करणे गरजेचे आहे. या त्रुटींची पूर्तता प्रथम पूर्ण करुन घ्यावी त्यानंतर हा बस मार्ग सुरु करावा. अन्यथा कुदळवाडी येथे बस रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)