टी-२० विश्वचषक २०२२ च्या २७ व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा ६५ धावांनी पराभव केला. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने १६७ धावा केल्या होत्या. श्रीलंकेला विजयासाठी १६८ धावांची गरज होती, मात्र संघ १०२ धावांवरच सर्वबाद झाला. मात्र हा सामना सुरु होण्याअगोदर इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
विराटला साऊथ आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात सचिनचा ‘हा’ मोठा विक्रम मोडण्याची संधी
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याने श्रीलंकेच्या राष्ट्रगीताबद्दल त्याच्या ट्विटर खात्यावर एक टिप्पणी केली आहे. यावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. बेअरस्टोने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, “श्रीलंकेचे राष्ट्रगीत जगातील सर्वात मोठे राष्ट्रगीत आहे का? काहींना तर इंग्रजीचा एक शब्दही आठवत नाही आणि दुसऱ्या बाजूबद्दल मला माहिती नाही. अशा स्थितीत ते लक्षात ठेवणं खूप कष्टाचं काम आहे.” अशा प्रकारची टिप्पणी बेअरस्टोने केली आहे.
Is the Sri Lanka National Anthem the longest in the world?
Some people can’t remember 1 verse of the English and don’t know the second! 😂 great effort!— Jonny Bairstow (@jbairstow21) October 29, 2022
बेअरस्टोच्या या ट्विटवर श्रीलंकेच्या अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण त्याला इतर देशांच्या राष्ट्रगीताचा आदर करण्याचा सल्ला देत आहेत, तर काहीत्याला जुन्या विचारांचे इंग्रज असे देखील म्हणत आहेत. त्याचबरोबर काही वापरकर्त्यांनी बेअरस्टोच्या या ट्विटचे समर्थन देखील केले आहे.
Great effort? For what? Remembering your country’s national anthem??? We sing our national anthem everyday for 13 years in school. So it’s only natural for us to remember it and news flash not every country speaks English and for us it’s not that long 🙄
— 𝖉𝖆𝖓𝖎_𝖘 🐥 || #1ΞX0 || Last Scene (@HunWooCoups) October 29, 2022