वीसगाव खोरे, (वार्ताहर) – एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. त्यामुळे महिला सक्षमीकरण महत्त्वाचे असून महिलांसह पुरुष आणि मुलांचे सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्सस्टाइल कंपनीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले. उत्रौली (ता भोर) येथील महिला दिना निमित्ताने ग्रामपंचायत, ग्रामस्त उञौली यांच्या वतीने होम मिनिस्टर व हळदी कुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, सरकारी दस्तावेजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात न दर्शवता उमेदवार नाव आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव, अशा स्वरुपात नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे. रणजीत शिवतरे यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला असून त्यांच्या मागे उभे राहिले पहिजे.
यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप,युवा नेते विक्रम खुटवड,पल्लवी शिवतरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, सुनील भेलके, भरत शिवतरे, प्रवीण जगदाळे,संतोष शिवतरे, मनोज खोपडे, अशोक शिवतरे, भरत लेकावळे एकनाथ शिवतरे, अमित शिवतरे, अतुल शिवतरे,गणेश निगडे केतन चव्हाण, सचिन पाटणे होते. चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप आणि विठठल दानवले यांनी केले. पल्लवी शिवतरे यांनी आभार मानले.
होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या मिनाक्षी शिवतरे (फ्रिज) सविता मोहिते, (एलईडी) निशा सुतार, (मायक्रोओवन) वैजयंता शिवतरे, (कुलर) मनिषा कुंभार, (गिझर)संगिता खोपडे, (टेबल फॅन) सारिका मोहिते, (सिलिंग फॅन) निकिता तारु, (ज्युसर) चित्रा शिवतरे, (शेगडी) स्वप्नाली येडवे (कुकर) सरोजिनी येडवे (एअरडायर) तसेच लकी ड्रॉमध्ये मानाच्या पैठणींचा मान वैशाली शिंदे, संजना तुपे, राजश्री उल्हाळकर, माधवी कुंभार, सविता शिरवले यांना मिळाला.