मुंबई – श्रीलंकेत उद्भवलेल्या भीषण आर्थिक परिस्थितीवर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रीलंकेतील आपल्या बांधवांवर सध्या जी परिस्थिती आली आहे, ती बघवत नसल्याचे अभिनेत्री म्हणाली आहे. जॅकलीनने तिच्या इन्स्टावर एक पोस्ट लिहून श्रीलंकेतील परिस्थितीवर भावना व्यक्त केल्या आहेत. तिची ही पोस्ट व्हायरस होताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
जॅललीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे,”श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने मला खूप वाईट वाटत आहे. मनात अनेक विचार येत आहेत. लोकांनी सध्या शांत राहावे, कोणत्याही गोष्टीला बदनाम करू नये. माझ्या देशातील नागरिकांना सध्या सहानुभूती आणि समर्थनाची गरज आहे.” अशी पोस्ट अभिनेत्री केली आहे.