पंढरपूर – पंढरपूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील निवृत्त नायब तहसीलदाराच्या 24 वर्षीय मुलाने प्रेमप्रकरणातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपुर्वी या मुलाने एक सुसाईट नोट लिहली आहे. त्यामध्ये त्याने ‘तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना’ असे हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.
निखिल दत्तात्रय चांडोले, वय 24 असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून निखिल पंढरपूर येथील निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले (रा. विजापूर गल्ली ) यांचा एकुलता एक मुलगा होता. निखिल हा पैठण येथे शिक्षण व येथील एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत होता. पैठणमध्येच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या रुमवर मित्र आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, प्रेमप्रकरणातून निखिलने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.