एलॉन मस्कचा मोठा निर्णय; भारतातील 2 लाखांहून अधिक ‘एक्स’ खाती बंद; काय आहे यामागचं कारण ?

X Banned Accounts| एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील दोन लाखांहून अधिक एक्स खाती बंद करण्यात आली आहे. कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
कंपनीने 26 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान एकूण 2,13,862 खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने बंद केलेल्या 1,235 खात्यांचाही समावेश आहे. X ने 26 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान 86 तक्रारी हाताळल्या, ज्या खाते निलंबनाविरुद्ध अपीलांशी संबंधित होत्या. यापैकी 7 खात्यांचा आढावा घेतल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. उर्वरित अहवाल दिलेली खाती कंपनीच्या निर्णयानुसार निलंबितच राहतील. X Banned Accounts|
कंपनीने अहवालात म्हटले आहे की, X प्लॅटफॉर्म बाल लैंगिक सामग्रीकडे दुर्लक्ष करत नाही. मग ते कोणतेही मीडिया फॉरमॅट असो अथवा मजकूर, चित्रण असो. वास्तविक, इंटरनेटच्या जगात बरेच लोक या स्वातंत्र्याचा गैरवापर करतात. अशा परिस्थितीत ते त्यांना हवे ते करतात. X प्लॅटफॉर्म अशा घटनांकडे दुर्लक्ष करणार नाही, तर ही खाती बंद केली जातील. X Banned Accounts|
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दर महिन्याला त्याचा एक अहवाल प्रसिद्ध करतो. या अहवालात वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी उचललेल्या पावलांचा उल्लेख आहे. तसेच कंपनीकडून कोणत्या खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे ते देखील सांगितले जाते. दरम्यान, X ने खात्यांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
हेही वाचा:
रिझर्व्ह बँकेची मुंबईतील ‘या’ बँकेवर कारवाई; ग्राहकांवर काय होणार परिणाम ?





