वॉशिंग्टन – अमेरिकेतील स्वैर गोळीबाराच्या आणखीन एका घटनेमध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये आणकीन 18 जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. अमेरिकेतील (At least 5 people killed, 18 injured in a shooting at a gay nightclub in Colorado Springs) कोलोरॅडो प्रांतातील “गे’समुदायाच्या एका नाईटक्लबमध्ये शनिवारी हा गोळीबार झाला.
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना “911′ या हेल्पलाईनवर अनेकजणांनी संपर्क साधला आणि या नाईट क्लबमध्ये गोळीबार झाल्याचे सांगितले. हा गोळीार करणारी व्यक्ती या नाईट क्लबमध्येच असल्याचा संशय अनेक जणांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
गोळीबार करणाऱ्या या संशयिताला पोलिसांनी कसे जेरबंद केले, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. याबत पोलिसांनी देखील काही माहिती दिली नाही. याबाबत सविस्तर वृत्त नंतर देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.