कोल्हापूर – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक पुन्हा एकदा वादात सापडली आहे. सोमवारी महामंडळाच्या अनेक सभासदांनी एकत्र येऊन धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणुकीला विरोध केला.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा बोलवावी, त्या सभेत विद्यमान कार्यकारणीच्या मागील तीन वर्षाचा हिशोब सादर करावा. महामंडळावर प्रशासकाची नेमणूक करून सारे काही सुरळीत झाल्यानंतर मग निवडणूक प्रक्रिया राबवावी. अशी भूमिका अमर मोरे, निलेश जाधव, बाबा लाड, विक्रम बिडकर, अवधूत जोशी यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
निवडणुकीची घोषणा करताना धर्मादाय उपायुक्तांनी संस्थेमधील गोंधळाची कारणमीमांसा शोधणे गरजेचे होते. गेले तीन वर्षे कार्यकारीणीच्या सभा घेतल्या नाहीत. वार्षिक सर्वसाधारण सभा नाहीत. सभासदांना झालेल्या आर्थिक उलाढालीचा अहवाल दिला नाही. संस्थेमध्ये चाललेले तथाकथित व्यवहार हे सर्व सभासदांना समजण्यापलीकडे आहे. पण धर्मादाय उपायुक्तांनी या गोष्टी विचारात घेऊन निवडणुका जाहीर करणे गरजेचे होते. किंबहुना विद्यमान संचालकांनीही त्यांना अंधारात ठेवून निवडणूक लावणेस भाग पडले आहे.
Nepal government : नेपाळमध्ये 3 उपपंतप्रधान; एका टिव्ही अँकरचाही समावेश
निवडणुकीनंतर येणारे नवीन संचालक मागील कार्यकारिणीने केलेल्या घटनाबाहा आणि बेहिशोबी चुकीच्या खर्चात जबाबदार राहतील का ? असा प्रश्न या सर्व मंडळींनी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेला विजय ढेरे, सुभाष कांबळे, सदाशिव पाटील, सुनील मुसळे, विश्वास कांबळे, किशोर सुतार, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.