मेलबर्न – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सलामीवीर डेव्हीड वॉर्नरचे द्विशतक व त्याला अन्य फलंदाजांनी दिलेल्या साथीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात दुसरा दिवसअखेर मंगळवारी 197 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावांवर रोखला होता.
#RanjiTrophy | युवा गोलंदाजाने ८ विकेट घेतल्या; विरोधी संघ अवघ्या ४९ धावांतच आटोपला
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात पहिला दिवसअखेर 1 गडी गमावून 45 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरून मंगळवारी पुढे खेळ सुरू झाल्यावर वॉर्नरने आक्रमक खेळी केली. मार्नस लेबुशेन 14 धावांवर परतल्यावर स्टिव्हन स्मिथच्या साथीत वॉर्नरने तिसऱ्या गड्यासाठी 239 धावांची भक्कम भागीदारी करत संघाचे त्रिशतक फलकावर लावले. स्मिथ मात्र, शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने 85 धावांची खेळी केली. वॉर्नरने आपला शंभरावा कसोटी सामना साजरा करताना दमदार द्विशतक फटकावले.
#RanjiTrophy | युवा गोलंदाजाने ८ विकेट घेतल्या; विरोधी संघ अवघ्या ४९ धावांतच आटोपला
मात्र, त्याला क्रॅम्पचा त्रास होऊ लागल्याने लगेचच मैदान सोडावे लागले. त्यावेळी ट्रॅव्हिस हेडने नाबाद 48 धावा करत संघाला साडेतीनशे धावांचा पल्ला पार करून दिला. वॉर्नरच्या जागी कॅमेरुन ग्रीन फलंदाजीला आला. मात्र, त्यालाही दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. दिवसातील उर्वरित खेळात हेडने ऍलेक्स कॅरीच्या साथीत आणखी नुकसान होऊ दिले नाही.
पहिली कसोटी जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाकडे आता 197 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी असून त्यांनी या सामन्यावर पकड घेतली आहे. खेळ थांबला तेव्हा त्यांनी पहिल्या डावात 3 गडी गमावून 386 अशी भक्कम मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून अनरीच नोर्जे व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.