काठमांडू – नेपाळमध्ये नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहाल प्रचंड यांच्या सरकारमध्ये 3 उपपंतप्रदान नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 8 मंत्र्यांचा समावेश असलेले नवीन मंत्रिमंडळ प्रचंड यांनी स्थापन केले आहे. काल प्रचंड यांना पंतप्रधान पदाची शपथ देतानाच अध्यक्षा बिद्या देवी भांडारी यांनी 8 मंत्र्यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली होती.
प्रचंड यांचे निकटवर्तीय असलेल्या बिष्णु पौंडेल, नारायणकाजी श्रेष्ठ आणि राबी लामिछाने या तिघांना उपपंतप्रदान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पौंडेल यांच्याकडे उपपंतप्रधान पदाबरोबर अर्थ मंत्रालय, श्रेष्ठ यांच्याकडे भौतिक पायाभूत सुविधा आणि परिवहन, तर लामिछाने यांच्याकडे गृह मंभालयाचीही जबाबदारी असणार आहे.
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली
टिव्ही अँकर बनले उपपंतप्रधान
नेपाळमधील 3 उपपंतप्रधानांमध्ये राबी लामिछाने हे टिव्हीवरील माजी निवेदक(टिव्ही अँकर )आहेत. त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी या राजकीय पक्षाला गेल्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठे यश मिळाले आहे. जेमतेम महिन्याभरापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत. 275 सदस्यांच्या सभागृहामध्ये हा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.