पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी नेमणूक केलेले सर्वसाधारण निरीक्षक राजीव रतन यांनी नुकतीच प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन येथील कार्यालयाला भेट दिली. अर्ज दाखल करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच, प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या सूचना केल्या. उमेदवारांच्या छाननी प्रक्रियेची देखील पाहणी केली.
दरम्यान, पोलीस ऑब्झर्व्हर आयुष मणी तिवारी यांनी आज पिंपरी विधानसभा कार्यालयाला भेट दिली. तसेच, निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदान केंद्रांची माहिती घेतली. एकूण 399 मतदान केंद्रापैकी मतदार ओळखपत्र कमी असलेल्या मतदान केंद्रांची माहिती घेतली. अशा केंद्रांवर मतदान सुरळीत होण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्झर्व्हर), सीसीटीव्ही यंत्रणा आणि आवश्यकता भासल्यास निमलष्करी दलाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पिंपरी विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी राजीव रतन यांना 9404542827 या भ्रमणध्वनी क्रमांकावर कळवाव्या. तसेच, ीरक्षर्ळीं.ीरीींरप07ऽसारळश्र.लो या ई-मेलवर तक्रारी पाठवता येतील. तसेच, राजीव रतन हे सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत व्हीव्हीआयपी (हरित इमारत), शासकीय विश्रामगृह, रूम नंबर 2016 येथे उपलब्ध असतील. पोलीस आब्झर्व्हर आयुषमणी तिवारी यांना 9498111171 या क्रमांकावर पिंपरी विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेबाबत असलेल्या तक्रारींसाठी संपर्क साधता येणार आहे.