पुणे – साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असणाऱ्या दसऱ्यादिवशी यंदा वाहन खरेदीत 82 वाहनांची भर पडली आहे. तसेच आरटीओच्या महसुलात काहीअंशी वाढ झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे यंदा 5 हजार 932 वाहनांची नोंद झाली आहे. मागील वर्षी 5 हजार 850 वाहनांची नोंद झाली होती.
मागील वर्षी साडेपाच हजार वाहन नोंदणीतून कार्यालयाला 20 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा केवळ 82 वाहनांची भर पडली असली. तरी मात्र 2 कोटी 54 लाख 25 हजार 589 रुपयांची महसुलात वाढ झाली आहे. यावर्षी एकूण 23 कोटी 29 लाख 25 हजार 589 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.