Ekta Kapoor Trolled : टीव्हीची क्वीन एकता कपूर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे वर्चस्व गाजवते. एकता कपूरची अशी एकही मालिका नाही जी लोकांना आवडत नसेल. याच कारणामुळे तिला टीव्हीची राणीही म्हटले जाते. कुठल्या ना कुठल्या कारणाने एकता हेडलाईन्सचा भाग राहते. तिने नुकतेच MAMI फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. यादरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
चित्रपट महोत्सवात एकता काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होती. तिने ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूप छान दिसत होती पण तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
एकता कपूरचा रेड कार्पेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे. व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘छोटा भीम’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘यार, तिचा ड्रेसिंग सेन्स खूपच खराब आहे.’
एकता कपूरला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ती अनेकवेळा तिच्या ड्रेसमुळे बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, एकता कपूरने नुकताच थँक यू फॉर कमिंग या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकता आणि रिया कपूर यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती. भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी, करण कुंद्रा यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.