The Sabarmati Report| बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसी त्याच्या ’12 वी फेल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यातील त्याच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर आता विक्रांत त्याच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात दिसणार आहे. विक्रांत लवकरच ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दिसणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’चा हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. राशी खन्नाने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.
View this post on Instagram
तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘2 ऑगस्ट रोजी ‘द साबरमती रिपोर्ट’च्या फाइल्स पुन्हा उघडणार.’ विक्रांत मेस्सी आणि राशी खन्ना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ आता नव्या तारखेला रिलीज होणार आहे. याआधी 3 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता निर्मात्यांनी रिलीज डेट बदलली असून हा चित्रपट आता 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे. The Sabarmati Report|
View this post on Instagram
साबरमती एक्स्प्रेसच्या दु:खद घटनेला 22 वर्षांनंतरही लोकांच्या नजरेतून लपलेले सत्य ‘द साबरमती रिपोर्ट’च्या टीझरने समोर आणले आहे. यात विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले असून शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज होणार आहे.
हेही वाचा:
अनन्या-आदित्य रॉय कपूरचं अफेअरबाबत चंकी पांडे म्हणाला, ‘माझ्यापेक्षाही जास्त पैसे कमवत…”