Tusshar Kapoor : अभिनेता तुषार कपूर त्याच्या कॉमेडीमुळे प्रसिद्ध आहे. गोलमाल चित्रपटामुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. यातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. लवकरच तो तुषार कपूर LSD 2 या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तुषार कपूर एकता कपूरच्या LSD 2 मध्ये एक महत्त्वाचा कॅमिओ साकारताना दिसणार आहे.
याआधी एकता आणि तुषार ‘क्या कूल हैं हम’, ‘शूटआउट ॲट वडाला’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ सारख्या चित्रपटात एकत्र आले आहेत. आतापर्यंत निर्मात्यांनी LSD 2 चे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. पहिले पोस्टर 2023 मध्ये शेअर करण्यात आले होते आणि दुसरे पोस्टर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी रिलीज करण्यात आले होते.
LSD 2 नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा शोध घेते आणि इंटरनेट युगात आधुनिक काळातील प्रेमाचे लपलेले पैलू समोर आणते. बालाजी टेलिफिल्म्स आणि कल्ट मूव्हीजचा विभाग बालाजी मोशन पिक्चर्स, एकता कपूर आणि शोभा कपूर निर्मित, दिबाकर बॅनर्जी प्रॉडक्शन LSD 2 सादर करते. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.