मुंबई – एकता कपूर तिच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या नव्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला, शिबानी बेदी, करण कुंद्रा यांसारख्या कलाकारांच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्माती एकता कपूर मुंबईतील एका कार्यक्रमात दिसली. एकता कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या व्हिडिओवरून तिला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये एकता कपूर तिची मैत्रिण क्रिस्टल डिसूजासोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये ‘ड्रीम गर्ल 2’ चे पोस्टरही दिसत आहे. एकता आणि क्रिस्टल पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. या व्हिडिओतील एक गोष्ट लोकांना आवडत नाहीये ती म्हणजे एकता कपूरचा आत्मविश्वास. या व्हिडिओमध्ये बोल्ड कपड्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाल्याचे आता सोशल मीडिया युजर्स म्हणत आहे.
अनेक युजर्सने तिल सल्लाही दिला आहे आणि म्हटले आहे की,’ज्यात तु कम्फर्टेबल नाही असे कपडे घालायचे. तर एका युजर्सने तिला कपड्यांवरून ट्रॉल करत म्हटले आहे,’अशा बोल्ड कपड्यांमुळे तू लपवत आहे का? व्हिडीओच्या शेवटी एकता आणि क्रिस्टल वेगळ्या वाटेने जातात.
‘वीरे दी वेडिंग’नंतर एकता कपूर पुन्हा एकदा असाच शुगर कोटेड चित्रपट ‘थँक यू फॉर कमिंग’ घेऊन आली आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकरला लग्नासाठी मुलगा सापडत ना, यादरम्यान शहनाज गिल ओशोंच्या पुस्तकांची वकिली करताना दिसत आहे. प्रेम, मैत्री आणि नातेसंबंध या चित्रपटात वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.