मुंबई – मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सभेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दसरा मेळावा आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा एल्गार करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला कडक इशारा देत बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय, असा घणाघात केला होता.
यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येत आहे. शिवसैनिकांवर विश्वास नाही, म्हणून प्रतिज्ञापत्र घेतले जात आहेत. अडीच वर्षांनी गटप्रमुखांना अच्छे दिन आले.’ असा टोलाही टोला एकनाथ शिदेंनी लगावला.
उध्दव ठाकरेंचे यांच्या सभेतील महत्वाचे मुदद्दे…
1. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एल्गार; शिंदे सरकारला कडक इशारा, संजय राऊत मोडेन, पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय!
2. मुलं पळवणारी टोळी पाहिली पण बाप पळवणारी औलाद राज्यात – उद्धव ठाकरे
3. भाजपला आस्मान दाखवणारच, कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिला होता – उद्धव ठाकरे
4. मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत, अमित शाह हे त्यापैकीच एक – उद्धव ठाकरे