मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यापूर्वी उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी संवाद साधायचे मात्र त्यांनी शिवसेना भवनात येऊन माध्यमांशी सवांद साधला. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे म्हंटले. शिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं. यावर आता माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल मत स्पष्ट केले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेबद्दल म्हणाले,’मी टीकेवर काहीही एक बोलू इच्छित नाही, योग्य वेळी नक्की बोलेन,” असं सांगत थेट भाष्य करणं टाळलं.’
दरम्यान, शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेचे आहोत. आम्ही हे सर्व हिंदुत्वासाठी करतोय असे सांगितले आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय असे देखील त्यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.