मुंबई – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले आहे. त्यासोबतच चर्चा सुरू झाली, ती कुणाला शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागणार याची. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून संभाव्य मंत्र्यांच्या यादी तसेच नावे सध्या चर्चेत आली आहे.
महाराष्ट्र भाजपमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पहिल्या फळीतील नेते आहे. यातच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री तर आता चंद्रकांत पाटील यांच्यावर काय जबाबदारी याची चर्चा सध्या राजकारणाच्या वर्तुळात जोरदार रंगली आहे.
मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात समावेश नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्ष हे पक्षाचे पद आहे. त्यामुळे आगामी काळातही त्यांना भाजप पक्ष विस्तारासाठीच काम करावे लागणार आहे. तरी सर्वकाही पक्ष श्रेष्ठींकडून ठरवले जाईल अशीही चर्चा रंगली आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार तर आता चंद्रकांत पाटलांना केवळ पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.