Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा एअर अॅम्ब्युलन्सद्वारे एकनाथ खडसेंना तातडीने मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही रुग्णालयात जाऊन एकनाथ खडसे यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आता स्वत: एकनाथ खडसे यांनी ट्वीटद्वारे (एक्स) त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
एकनाथ खडसे यांचे ट्वीट –
एकनाथ खडसे यांनी रुग्णालयातील त्यांचा फोटो शेअर करत लिहीले की, “मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!”
मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.
प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा… pic.twitter.com/wVDfimWoJx— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2023
दरम्यान, एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला होता. दुपारच्या सुमारास खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची स्थिती पाहाता पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. फोन येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.