जळगाव – गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस ( Eknath Khadse ED notice ) आल्याचं वृत्त काल माध्यमांमध्ये झळकत होत. या वृत्ताला आज स्वतः खडसे यांनी दुजोरा देताना आपल्याला ईडीची नोटीस आल्याचे सांगितले होते. याबाबत आता खडसे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली असून ईडीच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हंटलंय.
खडसे यांनी ईडीच्या नोटिसीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना खडसे यांनी, “आपल्याला दिनांक ३०/१२/२०२०ला हजर राहण्याबाबत ईडीचे समन्स मिळाले ( Eknath Khadse ED notice ) असून मी या चौकशीसाठी उपस्थित राहणार आहे. यापूर्वी अँटी करप्शन पुणे, नाशिक, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांनी याबाबतची चौकशी केलेली आहे. या सर्व चौकशांवेळी मी सर्व कागद-पत्रांसहित हजर राहिलेलो आहे. या सर्व संस्थान मी चौकशीमध्ये सहकार्य केलेलं आहे. याही वेळेस मी ईडीस मदत करेल.”
यावेळी बोलताना खडसे यांनी हे प्रकरण भोसरी येथील भुकांडाबाबतचे असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, हा भूखंड माझ्या पत्नीने खरेदी केला असून याबाबतची चौकशी करण्याचा ईडीला संपूर्ण अधिकार असून त्यांना योग्य ते सहकार्य करू.
खडसे सीडी लावणार का?
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी तुम्ही माझ्यामागे ईडी लावली ( Eknath Khadse ED notice ) तर मी सीडी लावेल असं खुलं आव्हान भाजपच्या नेत्यांना दिलं होत. अशातच आता खडसे यांना ईडीची नोटीस प्राप्त झाल्याने ते सीडी लावणार का? असा प्रश्न आज उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी विचारला. यावर खडसे यांनी याबाबत मी तुमच्याशी नंतर बोलेल असं सांगितलं.