धक्कादायक! रात्रीच्या वेळी विवाहित प्रेयसीला भेटायला गेला अन्…

देवरिया – उत्तर प्रदेशातील देवरिया येथे विवाहित प्रेयसीला भेटायला आलेल्या बिहारच्या तरूणाला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंकज मिश्र (सीवान जनपद, मठिया गाव) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. ही घटना नोनार पांडेय गावात घडली असून या प्रकरणी पंकजच्या वडिलांनी विवाहित प्रेयसीसह सहा जणांवर हत्येचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकजचे गावातीलच एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकमेकांसोबत लग्न करण्यास इच्छुक होते. मात्र, 8 डिसेंबर रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी तीचा विवाह उत्तर प्रदेशातील नोनार पांडेय गावातील तरूणासोबत केला.

23 डिसेंबर रोजी विवाहित प्रेयसीने पंकजला तीच्या सासरी बोलावले. रात्री उशीरा पंकज तिला भेटण्यासाठी पोहोचला असता प्रेयसीने व तिच्या सासरच्या मंडळींनी त्याला बेदम मारहाण केली. बनकटा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंकजला रूग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृत पंकजचे वडिल अनिल मिश्र यांनी विवाहित प्रेयसीसह तीचा पती व इतर काही जणाविरोधात हत्या केल्याचा आरोप केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे बनकटा पोलीसांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.